
क्राइम ब्रँच युनिट 11 ने मालाडच्या कुरार गावात कारवाई करून 6 लाख रुपयाचा गुटखा जप्त केला. गुटखा तस्करी करणाऱया राहुल दास आणि सिपाहील लाल पटेलला अटक केली. याचा पुढील तपास युनिट 11 करत आहेत. शहरात गुटखा विक्री आणि गुटख्याची विक्री करणाऱयावर पोलीस कारवाई करत असतात.
मालाडच्या कुरार गावात एक गुटख्याचा टेम्पो येणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक अभिजित जाधव यांना मिळाली. त्या माहितीनंतर आज युनिट 11 च्या पथकाने कुरार गावात सापळा रचला. कारवाई दरम्यान एका टेम्पोची तपासणी केली. त्यात चार लाख रुपयांचा गुटखा होता. तो गुटखा पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी दास आणि पटेलला ताब्यात घेतले. पटेलच्या घरातून पोलिसांनी आणखी 1 लाख 24 हजार रुपयाचा गुटखा जप्त केला.




























































