ज्ञानवापी प्रकरण : शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगला परवानगी, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगला अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुरातत्व खात्याला परवानगी दिली आहे. न्यायालयाचा हा निर्णय हिंदू पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. ही परवानगी देण्यासोबतच तेथील मूळ ढाच्याचे कोणतेही नुकसान होता कामा नये असे आदेशही दिले आहेत. न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्र आणि न्यायमूर्ती लक्ष्मी देवी यांनी ही परवानगी दिली आहे.

याआधी कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगबाबत जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने परवानगी नाकारली होती.