हनुमान चिनी होते! आता भाजप खासदार आझादांनी तोडले अकलेचे तारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अष्टपैलू खेळाडू किर्ती आझाद हे तीन वेळा भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेले आहेत. मात्र गेल्या वर्षी पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले होते.

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रामभक्त हनुमानाच्या जात, धर्मांवरून राजकीय व्यक्तींचे वादग्रस्त वक्तव्यांची रीघ सुरुच आहे. भाजपचे आमदार बुक्कल नवाब यांनी गुरुवारी रामभक्त हनुमान मुसलमान होते असे अजब वक्तव्य केले होते. यासाठी त्यांनी चित्र-विचित्र तर्कही मांडला होता. आता खासदार कीर्ती आझाद यांनी तर हनुमान हे तर चक्क चिनी असल्याचे वक्तव्य केले आहे.

खासदार कीर्ती आझाद म्हणाले की, हनुमान हे चिनी होते. आपले वक्तव्य खरे आहे दे दर्शवण्यासाठी ते पुढे म्हणाले की, सर्व ठिकाणी ही अफवा पसरत आहे की चिनी लोकं दावा करत आहेत की हनुमानजी चिनी होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे आधीच रामभक्त हनुमानाच्या जात, धर्मावरून सुरू असलेल्या वादात भर पडली आहे.

याआधी राजस्थानात विधानसभा निवडणूक प्रचारात बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित-आदिवासी होते असे वक्तव्य केले होते. यावरून मोठे वादळ उठले होते. त्यानंतर अलवार येथे प्रचारसभेत बोलताना सत्यपाल सिंह यांनी हनुमानजी हे दलित नाही तर आर्य होते असे म्हटले होते. तसेच अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षांनी हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडले होते. तर उत्तर प्रदेशचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी हनुमान हे जाट असल्याचे म्हटले होते.