हनुमान दलित नाही आदिवासी होते, अनुसूचित जाती अध्यक्षांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, लखनऊ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे. यावरून वाद सुरू असतानाच अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षांनी हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

नंदकुमार साय हे अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांनी दावा केला आहे की अनुसूचित जातींमध्ये हनुमान हे एक गोत्र असतं. कुडूक या अनुसूचित जातीमध्ये तिग्गा नावाचे गोत्र आहे ज्याचा अर्थ वानर असा होतो. अनुसूचित जातींमध्ये हनुमान आणि गिधाड अशी देखील गोत्रं आहेत असं साय यांचं म्हणणं आहे. प्रभू श्रीरामाने दंडकारण्यात सैन्य गोळा केलं. या सैन्यामध्ये अनुसूचित जातींची मंडळी मोठ्या प्रमाणावर होते, त्यामुळे हनुमान हे दलित नव्हते तर अनुसूचित जातीचे होते असं नंदकुमार साय यांचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानमध्ये एका प्रचार सभेमध्ये बोलताना भगवान हनुमान हे दलित असल्याचं म्हटलं होतं. अलवर जिल्ह्यातील मालखेडा इथल्या सभेत बोलताना ते म्हणाले की बजरंगबली असे  देवता आहेत जे वनवासी,गीरवासी दलित आणि वंचित आहेत. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर जबरदस्त टीका व्हायला लागली आहे.