हनुमान आर्य होते! सत्यपाल सिंह यांचे नवे रामायण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, जयपूर

भाजप नेत्यांकडून देव-देवतांच्या जाती शोधणे सुरूच आहे. रामभक्त हनुमान हे आर्य होते, असे वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी केले आहे.

दोन दिवसांपूर्वी राजस्थानात विधानसभा निवडणूक प्रचारात बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित-आदिवासी होते असे वक्तव्य केले होते. त्यावरून वादळ उठले असतानाच आज अलवार येथे प्रचारसभेत बोलताना सत्यपाल सिंह यांनी हनुमानजी हे दलित नाही तर आर्य होते असे म्हटले आहे. राम आणि हनुमान यांच्या काळात जातीव्यवस्था नव्हती, तर वर्णव्यवस्था होती. वाल्मीकी रामायण आणि रामचरितमानस यानुसार रामायण काळात दलित, वंचित, शोषित नव्हते अशी पुष्टीही सत्यपाल सिंह यांनी जोडली आहे. मात्र, यावेळी सत्यपाल सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विधानाबाबत भाष्य करणे टाळले आहे.