
हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) पदाधिकाऱयांना मी ओळखत नव्हतो आणि माझी कुणाशीही खास जवळीक नव्हती. माझ्या नावाची शिफारसही कुणी संघनेतृत्वासाठी केली नाही. त्यामुळेच कदाचित मी संघाचा कधी कर्णधार झालो नाही, असा खळबळजनक आरोप टीम इंडियाचा ज्येष्ठ ऑफस्पिनर आणि ‘टर्बोनेटर’ म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय असलेल्या हरभजन सिंगने केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हिंदुस्थानी संघाचे कर्णधारपद चर्चेत आहे. यासंदर्भातील प्रश्नावर हरभजन सिंगने वरील आरोप केला आहे.
‘तुम्ही बोर्डातील पॉवरफुल सदस्याचे फेव्हरिट नसाल तर तुम्हाला कर्णधार बनण्याचा सन्मान मिळत नाही. पण मला वाटते की, आता या गोष्टीवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. मी टीम इंडियाचे नेतृत्व करण्यात सक्षम होतो. कारण मी अनेक कर्णधारांना मार्गदर्शन करत होतो. मी हिंदुस्थानचा कर्णधार झालो नाही, ही फार मोठी गोष्ट नाही. देशाचा कर्णधार नाही झालो याबद्दल मला वाईटही वाटत नाही.


























































