
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
आरक्षण व शेतकऱयांना कर्जमाफी या मागणीसाठी गेल्या चौदा दिवसांपासून उपोषण करणारे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी जलग्रहण केले, मात्र मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. उपोषणामुळे हार्दिक यांचे वजन घटले आहे. काल खोडलधाम ट्रस्टचे नरेश पटेल हे भेटण्यासाठी आले असतानाच हार्दिक यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. हार्दिक पटेल यांनी पाणी न प्यायल्यास त्यांच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो असे उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले, परंतु हार्दिक यांनी त्यास नकार दिला. शरद यादव यांच्या हस्ते त्यांनी जलग्रहण केले.



























































