मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना हायकोर्टाकडून दिलासा, जामीन मंजूर

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील कथित फोन टॅपिंग प्रकरणी ईडीने नोंदवलेल्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस प्रमुख संजय पांडे यांना जामीन मंजूर केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने अटक केली आहे. संजय पांडे मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. राष्ट्रीय शेअर बाजार को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली होती.