टीप्स – पोटदुखीवर उपाय

  • जेवल्यानंतर लगेच झोपू नये, रात्री शतपावली करावी.
  • जेवणानंतर लिंबाच्या रसात दोन थेंब आल्याचा रस मिसळून कोमट पाण्यातून प्यावे.
  • हिंग घालून ताक प्यायल्याने अपचनाची समस्या दूर होते, तोंडाला चव येण्यास, भूक वाढवण्यासाठीही मदत होते.
  • अपचन होत असल्यास एक चमचा आणि त्यात सैंधव मीठ मिसळावे. ते पाणी गरम पाण्यासोबत प्यायल्याने अपचन दूर होते.
  • आल्याच्या तुकडय़ात थोडेसे सैंधव मीठ घालून अपचनामुळे होणारा पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते.
  • दुधात पॅल्शियम असते. त्यामुळे शरीरातील पीएच बॅलन्स संतुलित राहते आणि अन्नपचनासही मदत होते. थंड दुधामुळे पोटातील जळजळीवर ताबडतोब आराम मिळतो.
  • पुदिन्यात नैसर्गिक पूलिंग एजेंट असतात. पोटातील ऑसिड कमी करून पचनतंत्र मजबूत करण्यासाठी पुदिना उपयुक्त ठरतो. त्यासाठी पुदिन्याची पाने पाण्यात उकळवून ते पाणी प्या.
  • आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने पोटदुखीवर परिणामकारक ठरतात. प्रत्येक दिवशी एक चमचा आवळा पावडर घेतल्यास ऑसिडिटीपासून मुक्तता लाभेल.
  • वारंवार चहा-कॅाफी पिणे टाळावे.
आपली प्रतिक्रिया द्या