Health Tips – झोपण्यापूर्वी ‘या’ 7 गोष्टींचे सेवन चुकूनही करू नका, आताच व्हा सावधान

धकाधकीच्या जीवनात आराम मिळणे म्हणजे स्वर्गसुखच. पण अनेकांना झोपेच्या समस्या असतात. याला कारण तुमचा आहारही असू शकतो. तसेच झोपण्यापूर्वी तुम्ही काय खाता, पिता याचाही झोपेवर परिणाम होतो. झोपण्यापूर्वी जंक फूड खाऊ नये हे आपल्याला माहीत आहे, मात्र यासह अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचे सेवन झोपण्यापूर्वी करू नये. जाणून घेऊया…

1. फ्लॉव्हर आणि कोबी
फ्लॉव्हर आणि कोबीचे दिवसा सेवन केल्यास फायदेशीर असल्याचे ताज्या अहवालातून समोर आले आहे. यात व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असते, मात्र फायबरचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असते. यामुळे यास पचायला जास्त वेळ लागतो. झोपण्यापूर्वी तुम्ही फ्लॉव्हर आणि कोबी खाल्ल्यास झोप न लागण्याची समस्या उद्भवू शकते.

2. चीज –
रात्रीच्या जेवणात चीज खाणे शक्यतो टाळावे. कारण यात टायरामाइन आणि एमिनो एसिड असते. झोपण्याआधी याकॅगे सेवन केल्यास पोटदुखी आणि पोटात जळजळ याची समस्या होऊ शकते.

Health Tips – झोपण्यापूर्वी खजूर खाण्याचे ‘हे’ 8 फायदे जाणून घ्याल तर आश्चर्यचकित व्हाल

3. अल्कहोल –
भलेही 1 ग्लास रेड वाइन प्यायल्याने तुम्हाला झोप येत असेल मात्र अल्कोहलचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. यामुळे हळूहळू झोपेच्या समस्या होऊ शकतात.

4. कॉफी –
अनेकांना झोपण्यापूर्वी कॉफी घेण्याची सवय असते. मात्र कॉफीत असणारे कैफिन याचा झोपेवर परिणाम होतो. यामुळे झोप उडू शकते आणि संपूर्ण शरीराचे संतुलन बिघडू शकते.

Health – प्रतिकारशक्तीच नाही तर लैंगिक क्षमताही वाढवते ही आयुर्वेदिक वनस्पती, जाणून घ्या फायदे-तोटे

5. डार्क चॉकलेट –
डार्क चॉकलेटमध्ये कैफिन आणि एमिनो एसिड दोन्ही आढळते. यामुळे एनर्जी वाढण्यास मदत होते, मात्र झोपेआधी खाण्याऐवजी याचे दिवसा सेवन केल्यास उत्तम.

6. संत्र्याचा रस –
संत्र्याचा रस शरीराला फायदेशीर असतो, मात्र झोपण्याच्या आधी याचे सेवन करणे योग्य नाही. यामुळे झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Health Tips – नैसर्गिकरित्या वाढवा प्रतिकारशक्ती, ‘या’ पाच गोष्टींचे करा रोज सेवन

7. टोमॅटो सॉस –
टोमॅटो सॉस लहान, थोरांनाही आवडते. मात्र याच्या सेवनाने ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो आणि कधी-कधी अपचनाचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणात टोमॅटो सॉसचा वापर केल्यास जवळपास 3 तासांनीच झोप घ्यावी असे आहारतज्ज्ञ सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या