
> स्वयंपाकघरात काम करताना चटका लागल्यास त्यावर केळीची साल लावावी. त्यामुळे चटका लागल्यावर होणारी जळजळ थांबते आणि आराम मिळतो. तसेच चटक्यामुळे त्वचेवरील डाग लवकर निघून जातो.
> हिवाळ्यातील सर्वात मोठी समस्या कोरड्या त्वचेची असते. यासाठी अनेकदा पेट्रोलियम जेलीचा वापर केला जातो, मात्र अशावेळी घरच्या घरी केळीचा फेसपॅक बनवून वापरल्यास त्वचा तजेलदार होते. यासाठी केळं कुस्करून त्यामध्ये 2 मोठे चमचे मध घालावे. हा फेसपॅक 15-20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावा. त्यानंतर चेहरा धुवावा. यामुळे त्वचा टवटवीत होण्याबरोबरच तजेलदारही होते.
> कोरड्या आणि निर्जिव केसांच्या समस्येवर सोपा उपाय करण्यासाठी दोन केळ्यांची पेस्ट बनवावी. त्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि तीन मोठे चमचे मेयोनेज टाकून त्याचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण हेअरडाय लावतो त्याप्रमाणे केसांवर लावावे. अर्ध्या तासानंतर चांगल्या प्रकारे केस धुवावेत. यामुळे कोरड्या आणि निर्जिव केसांना नवीन लकाकी मिळेल.
> हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याचे प्रमाण वाढते. या भेगांवर मलम लावून उपचार केले जातात. त्याऐवजी केळ्यांचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी उपाय करता येऊ शकतो. यासाठी केळी, मध आणि लिंबाचे मिश्रण पायाच्या भेगा भरण्यासाठी उपयुक्त असते. पिकलेलं केळं कुस्करून दोन-तीन चमचे मध आणि लिंबाचा रस टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. हे मिश्रण भेगा पडलेल्या टाचांवर लावून ठेवा. एक तासानंतर पाय कोमट पाण्याने धुवून घ्या. एक दिवसाआड पायांना असे मिश्रण लावल्यास टाचेच्या भेगा भरून येण्यास मदत होते.
> दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळीची पिवळी साल गुणकारी आहे. केळीची साल दोन मिनिटे दातांवर घासल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो.
> पचनाशी निगडीत त्रास असेल, तर केळे खाण्याचा फायदेशीर ठरते. कारण केळ्यामधील फायबर्ससारखे घटक शौचाला साफ होण्यास मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी नक्की केळे खाके.
> केळ्यामधील विशिष्ट घटक शरीराला ऊर्जा देतात. यात शर्करेचे प्रमाण खूप असते. त्यामुळे शरीर कमाकणाऱ्या लोकांना रोज भरपूर केळी खाण्यास सांगितले जाते. त्यामुळे दुधासोबत एक केळे खाल्ल्यास कमी काळात जास्त ऊर्जा मिळते.
> केळे खाल्ल्याने रक्तकाहिन्यातील रक्त पातळ होते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते. केळ्यातील मॅग्नेशियममुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि रक्त गोठून राहत नाही. त्यामुळे ज्यांना रक्त गोठण्याचा त्रास आहे त्यांनी केळे खाल्ले तर फायदा होतो.
> केळ्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता असणाऱ्यांनी नियमित केळे खाके त्यामुळे ऑनिमियाचा त्रास उद्भकत नाही.
> जुलाब झाले असतील तर ते थांबण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. त्यातच एक म्हणजे केळे खायला सांगितले जाते. लंघन करून दिकसातून दोन ते तीन वेळा अर्धे अर्धे केळे खाल्ल्यास जुलाबाकर चांगला परिणाम होतो.






























































