Health Tips – भिजवलेले ‘अक्रोड’ खा अन् मधुमेहावर मिळवा नियंत्रण, आणखीन ही आहेत बरेच फायदे; वाचा…

अक्रोड आणि बदाम सारख्या गोष्टी खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. म्हणूनच त्यांना सुपरफूडच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. अक्रोडमुळे आपल्या मेंदूला पोषकतत्वे मिळतातच, यासोबतच आपल्या शरीरालाही बरेच फायदे होतात. एका संशोधता असा दावा करण्यात आला आहे की, भिजलेले अक्रोड खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहते.

तज्ज्ञांच्या मते, भिजलेले अक्रोड खाणे ही एक चांगली सवय आहे. असे मानले जाते की बियाणे आणि शेंगदाण्यांमध्ये अनेक एंजाइम असतात जे पचवणे खूप कठीण असते. यामुळे यांना भिजून खाल्ल्यास पचवणे सोपे जाते. अक्रोड भिजून खाल्ल्यास त्याच्या पोषक मुल्ल्यांवर कोणताही परिणाम होत नाही.

तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, दररोज अक्रोड भिजून खल्लास टाइप 2 मधुमेह नियंत्रणात आणले जाऊ शकते. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. तसेच हे शरीरातून रक्तातील शुगर (साखर) रिलीज करण्यासाठीही मदत करते. यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित राहते. भिजवलेल्या अक्रोडचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 15 आहे. ज्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी हा आरोग्यदायी नाश्ता.

अक्रोड खाण्याचे फायदे –

  • अक्रोड हे सारक गुणधर्माचे असल्याने मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी अक्रोड नियमित सेवन करावे. यामध्ये असणाऱ्या तेलामुळे व तंतुमय पदार्थांमुळे शौचास साफ होते.
  • अक्रोड हे वातघ्न असल्यामुळे संधिवात या आजारावर उपयुक्त आहे. संधिवात असणाऱ्यांनी 7-8 अक्रोडाचे सेवन करावे.
  • शुक्रजंतू कमी असल्यामुळे वंध्यत्व निर्माण झालेल्या पुरुषांनी अक्रोडचे नियमित सेवन करावे.
  • अक्रोड हा पौष्टिक असल्याने शरीर कृश असलेल्यांनी व अशक्तपणा जाणवणाऱ्यांनी सकाळी उठल्याबरोबर 2-3 अक्रोड इतर सुक्या मेव्यासोबत खावेत.
आपली प्रतिक्रिया द्या