LIVE-मुंबईत पुढील २ ते ३ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ठाणे

  • कल्याण येथील मलंगगड परिसरात पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती, वीजपुरवठा खंडित
  • भिवंडी शहरात रस्त्यावर पाणी
  • पुढील पाच दिवसात मुंबई, कोकणसह गोव्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
  • येत्या दोन दिवसात जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
  • उल्हासनगर स्थानक परिसरात पाणी भरलं
  • ulhasnagar-rain
  • रेल्वे पुलाखाली पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने वाशिंदचा ४२ गावांशी संपर्क तुटला
  • मुंबईत पुढील २ ते ३ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
  • अंबरनाथच्या शिवमंदिराचा परिसर पाण्याखाली
  • खेड येथे चोरटी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने मुंबई- गोवा महामार्गावर पाणी साचले
  • कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान रेल्वेसेवा पूर्ववत, मात्र गाड्या उशिराने
  • पालघर येथील वाडा तालुक्यातही मुसळधार पाऊस
  • मुंबईतल्या सायन, चेंबूर, गोवंडी, दक्षिण मुंबई, गोरेगाव, अंधेरी, वांद्रे आदी भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी
  • खबरदारी म्हणून नागपुरातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
  • पुढचे तीन दिवस नागपूरसह विदर्भ आणि पश्चिम किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा
  • प्रगती एक्सप्रेसची वाहतूकही वळवण्यात आली आहे.
  • पुणे-भुसावळ एक्सप्रेस दौंड-मनमाड मार्गे आणि भुसावळ-पुणे एक्सप्रेसला कल्याण-कर्जत मार्गे वळविण्यात आली आहे.
  • रेल्वे रुळावर पाणी साचल्याने नांदेड- पनवेल एक्सप्रेस कल्याण-कर्जत मार्गे वळवण्यात आली आहे.
  • महामार्गांवर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा
  • ट्रॅकवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल
  • karjat-panvel-railtrack-1
  • कर्जत-पनवेल रेल्वेमार्ग पाण्याखाली
  • karjat-panvel-rain-2
  • मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस
  • डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाची हजेरी
  • खेडमधील बोरघर येथे रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे वाहतूक ठप्प
  • गुहागर-मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
  • प्रवाशांची वाट लागली, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
  • विठ्ठलवाडी स्थानकाजवळ रेल्वे रुळावर पाणी साचले
  • कर्जत ते कल्याणदरम्यान मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

  • महाड बाजारपेठ, भाजी मंडई, दस्तुरी भागात पाणी भरण्याची शक्यता
  • कल्याण-नगर महामार्गावर किशोर गावाजवळ मुरबाडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
  • पुणे-भुसावळ पॅसेंजरही दौंड-मनमाडमार्गे वळवण्यात आली
  • नांदेड-पनवेल कल्याणमार्गे वळवण्यात आली
  • प्रगती एक्सप्रेसची वाहतूक वळवली
  • महाड शहरातील गांधारी नदीवरचा पूल पाण्याखाली गेला
  • काळ, सावित्री नदीने धोक्याची पातळी गाठली
  • महाड-पोलादपूर भागात पावसाचा जोर वाढला
  • अलिबाग, खोपोली उरणमध्ये जोरदार पाऊस
  • चौक-कर्जत स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर १० ते १२ इंच पाणी साचले
  • अमन लॉज आणि माथेरानदरम्यान रुळावर झाड कोसळले
  • माथेरानची टॉय ट्रेन सेवा तात्पुरती थांबवली, ट्रॅकवर झाड कोसळल्याने घेतला निर्णय

heavy rain in airoli area of navi mumbai

  • मुरबाडमधील उल्हास नदी दुथडी भरून वाहायला लागली
  • कल्याण, अंबरनाथ, कर्जतमध्ये मुसळधार पाऊस
  • मुरबाड आणि कल्याणदरम्यानची वाहतूक बंद

airoli-rain-2

  • रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले