
निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेना मांडवी शाखेचे माजी शाखाप्रमुख हेमंत कोळी यांचे निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवसेना शाखा क्र. 224 चे शाखाप्रमुख स्वप्निल कोळी यांचे ते वडील होत. हेमंत कोळी यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

























































