चार वर्षांपासून अघोषित आणीबाणी – मायावती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

देशात गेल्या चार वर्षांपासून अघोषित आणबाणी लागू झाल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता घुसमटत आहे, असा हल्लाबोल बसपा अध्यक्ष मयावती यांनी भाजप सरकारवर केला. सर्वसामान्य, गरीब, शेतकरी, कामगार, मजूर, मागास आणि दलितांविरोधी धोरणे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार राबवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपने सर्वसामान्यांचा विश्वास गमावला असून विकास आणि प्रगती याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नसल्याचेही त्या म्हणाल्या.