टाटा सन्सला दिलासा; फौजदारी खटल्याला हायकोर्टाची स्थगिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

सामना प्रतिनिधी, मुंबई

रतन टाटा आणि टाटा सन्सच्या संचालकांना मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. टाटाविरोधात उद्योजक नसली वाडिया यांनी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी अब्रुनुकसानीच्या खटल्याला हायकोर्टाने आज स्थगिती दिली.

टाटांच्या इंडियन हॉटेल कंपनीचे नसली वाडिया हे संचालक होते. डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 च्या कालावधीत वाडिया यांना शेअर होल्डरसह इतर संचालक मंडळाने हटवले. कंपनीतील अधिकाऱयांच्या स्पष्टीकरणावर असमाधान व्यक्त करत वाडिया यांनी दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला.

हा खटला रद्द करण्यात यावा यासाठी टाटा सन्सच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायमूर्तींनी टाटा सन्सला दिलासा देत दंडाधिकारी न्यायालयाने या खटल्याला स्थगिती देण्याचे आदेश दिले.