आर्यन खानला हायकोर्टाचा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला बुधवारी उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. कॉर्डेलिया क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने चालू वर्षाच्या सुरुवातीला क्लीन चीट दिली होती. त्या क्लीन चीटला आव्हान देत लॉच्या एका विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

ही याचिका बुधवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला आली. यावेळी खंडपीठाने याचिकाकर्ता प्रितम देसाईला खडे बोल सुनावले. ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली आहे. याचिका योग्य कशी काय आहे ते आम्हाला पटवून द्या, अन्यथा मोठय़ा आर्थिक दंडाला सामोरे जावे लागेल, असा सज्जड दम दिला. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने आपली जनहित याचिका बिनशर्त मागे घेतली.