सरकार पाडा, असे आवाहन केले…अन् नेता कार्यकर्त्यांसह व्यासपीठावरून खाली पडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरात आणि हिमाचल प्रदेशसाठी निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर तेथील राजकीय वातावरण तापत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री एका सभेसाठी आले होते. त्यावेळी हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडा आणि काँग्रेसला विजयी करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. यानंतर लगेचच त्यांचे व्यासपीठ अचानक कोसळले आणि अग्निहोत्री कार्यकर्त्यांसह खाली पडले. या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

मुकेश अग्निहोत्री यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते सभेला संबोधित करत होते. राज्यातील सरकारला हटवून काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. ते जनतेला आवाहन करत असतानाच उत्साहाच्या भरात अनेक कार्यकर्ते व्यासपीठावर जमा झाले. एकाचवेळी मोठ्य प्रमाणात व्यासपीठावर गर्दी झाल्याने व्यासपीठच कोसळले. त्यामुळे कार्यकर्त्यांसह अग्निहोत्री यांचा तोल गेला आणि सगळेच व्यासपीठावरून खाली पडले. सुदैवाने याघटनेत कोणीही जखमी झाले नाही.