बापरे! डायनासोरच्या काळातील मासा सापडला, 42 कोटी वर्षांपूर्वीची प्रजाती बघून संशोधक हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदी महासागरातील मादागास्कर बेटांवर डायनासोरच्या काळातील मासा सापडला आहे. 42 कोटी वर्षांपूर्वीची ही प्रजाती बघून संशोधक हैराण झाले आहेत. या माशाला ‘कोईलापँथ’ या नावाने ओळखले जाते.

मादागास्कर बेटांवर शिकाऱयांनी शार्क माशांसाठी लावलेल्या खास जाळ्यात कोईलापँथ मासा सापडला. शार्क माशाचे तेल आणि पंख मिळवण्यासाठी मच्छीमार खोल समुद्रात जाळे टाकतात. जिथे शार्क मासे एकत्र येतात, अशा खोल समुद्रात 328 ते 492 फुटांवर जाळे लावले जाते. त्यात हा दुर्मिळ मासा सापडला. कोईलापँथ माशाला आठ पंख आहेत. या माशाला 1938 सालापर्यंत लुप्त झाल्याचे मानले जात होते. आता पुन्हा तो सापडल्याने खळबळ उडाली आहे.

  • मच्छीमार त्यांच्या जिलेटीनच्या खास जाळ्यांचा वापर करून शार्क माशांना सहज जाळ्यात अडकवत आहेत. शार्क माशांच्या शिकारीमुळे कोईलापँथ माशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. मादागास्कर बेटांवर कोईलापँथ मासे मोजकेच आहेत. तिथला समुद्र या प्रजातीच्या माशांसाठी केंद्र बनला आहे. मात्र त्यांची अशीच शिकार होत राहिली तर ही प्रजाती पुन्हा दिसणार नाही.