
रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे ऍण्टेलिया हे अलिशान घर असलेल्या परिसरात एका चोरीच्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांडय़ा सापडल्या होत्या. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे. त्यामुळे एनआयएच्या पथकाने त्यासंबंधी माहिती घेण्यासाठी आज गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांची भेट घेतली. मुंबई गुन्हे शाखा आधी या प्रकरणाचा तपास करीत होती.
ऍण्टेलिया या घराशेजारी जिलेटिनच्या कांडय़ा व धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. त्यामुळे या प्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखा तपास करीत होती. मात्र या प्रकरणाचा तपास आता एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे एनआयएच्या पथकाने आज सहआयुक्त मिलिंद भारांबे यांची भेट घेऊन मुंबई गुन्हे शाखेने आजपर्यंत केलेल्या तपासाची माहिती जाणून घेतली.
































































