दहशतीसाठी पिस्तूल बाळगणारा साथीदारासह अटकेत, पिस्तुलासह पाच काडतुसे जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशतीसाठी जवळ पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला त्याच्या साथीदारासह वानवडी पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडुन एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

ओकेभाई ऊर्फ ओमकार चंद्रशेखर कापरे (27, रा. कोंढवा खुर्द), मनिष ऊर्फ आकाश मारुती झांबरे (वय २७ रा. होळकरवाडी, ऊरुळी देवाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील ओमकार यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. वानवडी पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान जवळ पिस्तूल बाळगणारा सराईत हा जेएसपीएम कॉलेज परिसरात येणार असल्याची माहिती अंमलदार सर्फराज देशमुख, राहुल गोसावी, नीलकंठ राठोड, संदीप साळवे, अमोल गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांना मिळाली होती.

यानुसार पथकाने सापळा रचून कापरे आणि झांबरे यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता कापरे याच्या कंबरेला पिस्तूल आढलून आले. यामध्ये पाच काडतुसे मिळाली. तसेच, आरोपींकडून दोन तलवारी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कापरे आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून प्रतिस्पर्धी व्यक्तींपासून असलेल्या धोक्यातुन आरोपी हा जवळ पिस्तूल बाळगत असल्याचे समोर आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.