
30जर्मनीचे थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्याचे प्रयत्न कमी पडले. त्यांना कोरियाचा नऊ गोलांच्या फरकाने पराभव करायचा होता, पण ते 7-2 फरकाने विजयी झाले आणि ब गटातून त्यांना दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. बेल्जियमने जपानचा 7-1 असा धुव्वा उडवत ब गटातून अव्वल स्थान पटकावत अंतिम आठ संघात आपले स्थान निश्चित केले. तसेच ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 9-2 फडशा पाडत अ गटात प्रथम स्थान पटकावत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
बेल्जियमला गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी जपानवर नऊ गोलांनी मात करणे गरजेचे होते, पण त्यांच्या निकलस वेलेनच्या हॅटट्रिकनंतरही ते 7 गोलच करू शकले. त्यातच जपानने 1 गोल केल्यामुळे बेल्जियम ब गटात दुसराच राहिला. आता त्यांना उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी फ्रान्सशी भिडावे लागणार आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील लढत 5-5 अशी बरोबरीत संपली.






























































