करार नको, टी–20 क्रिकेट हवंय! पूरन, होल्डर आणि मायर्सला विंडीजशी करारात रस नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील लीगमधून मिळणाऱया पैशांपोटी निकोलस पूरन, जेसन होल्डर आणि कायल मायर्स यांनी वेस्ट इंडीज क्रिकेटशी केंद्रीय करारातून माघार घेतली आहे. त्यामुळे ते आगामी 2023-24 सत्रात टी-20 क्रिकेट खेळतानाच दिसतील, पण आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.

विंडीजशी असलेल्या करारापेक्षा विदेशी टी-20 लीग खेळून प्रचंड मिळणारा पैसा हाच विंडीजच्या क्रिकेटपटूंना आवडू लागल्यामुळे कुणालाही कसोटी किंवा वन डे खेळण्यात जराही रस उरलेला नाही. सातत्याने खेळाडू करार मोडत असल्यामुळे आता विंडीजच्या करारात केवळ 14 पुरुष आणि 15 महिला क्रिकेटपटू उरले आहेत. आगामी टी-20 वर्ल्ड कप विंडीज आणि अमेरिकेत होत आहे. या स्पर्धेसाठी विंडीज संघात दमदार खेळाडू असावेत हीच माफक अपेक्षा विंडीज क्रिकेटची आहे. पूरन, होल्डर आणि मायर्स यांनी विंडीजचा पेंद्रीय करार मोडल्यामुळे आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांना आपले संघातील स्थान गमवावे लागण्याची शक्यता आहे.

विंडीजशी करारबद्ध असलेले क्रिकेटपटू

पुरुष – ऑलिक अॅथनेज, व्रेग ब्रेथवेट, किसी कार्टी, टी. चंदरपॉल, जोशुआ डासिल्व्हा, शाय होप, अकिल हुसेन, अल्जारी जोसेफ, ब्रॅण्डन किंग, गुडाकेश मोती, रोव्हमन पॉवेल, केमार रोच, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड

महिला – आलिया अॅलने, शेमाइन पॅम्पबेल, शामिलिया कोनेल, एफी फ्लेचर, चेरी अन प्रेसर, शबीका गजनबी, जेनिलिया ग्लास्गो, शेनेटा ग्रेमंड, चिनली हेन्री, झायदा जेम्स, मॅण्डी मंगरू, हिली मॅथ्यूज, करिश्मा रामाराक, स्टेफनी टेलर, रशाडा विलियम्स.