जस्टिन बीबरच्या चेहऱ्याला अर्धांगवायू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉलीवूडचा  प्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबर सध्या ‘रामसे हंट सिंड्रोम’ नावाच्या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. त्यामुळे त्याच्या चेहऱ्याच्या एका बाजूला पॅरालिसिस झाला आहे. त्यानेच सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. अलीकडेच जस्टिनने काही शोज रद्द केल्याने त्याचे चाहते नाराज होते. अखेर त्याने शो रद्द करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
व्हिडीओत तो म्हणाला, ‘तुम्ही पाहू शकता की डोळे मिचकावणे माझ्यासाठी कठीण झाले आहे. मी नीट हसू शकत नाही. माझ्या चेहऱ्याचा एक भाग पूर्ण पॅरालिसिस आहे. हा एक गंभीर आजार आहे. म्हणूनच मी माझे पुढील सगळे शो रद्द केले आहेत. शोसाठी शारीरिकरीत्या मला उपस्थित राहणे शक्य नाही.’ पुढे तो म्हणाला, ‘डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढचा काही वेळ मी विश्रांती करणार आहे. जेणेकरून मी पूर्णपणे बरा होऊ शकेन आणि परत येऊन मी ते करीन ज्यासाठी माझा जन्म झाला आहे.’