Home Quarantine चे शिक्के असताना कोल्हापुरात फिरत होते, पोलिसांनी घेतले ताब्यात

527

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असे असले तरी  आपल्या घराकडे फलटण येथून कागलच्या दिशेने पायी चालत प्रवास करणार्‍या 16 व होम क्वॉरंटाइनचे शिक्के हातावर मारले असताना शहरात फिरणार्‍या 4 अशा 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सर्वांना सिध्देश्वर यात्री निवास येथे ठेवण्यात आले आहे. नागरिक वारंवार रस्त्यावर येत असल्याने पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत असल्याचे चित्र आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गावोगावी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य याचबरोबर अन्य समाज घटकांचा समावेश करून समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. देशात संपूर्ण लॉकडाऊन जाहिर केल्याने रोजगाराच्या निमित्ताने गावातून परगावात व परराज्यांत गेलेले लोक मिळेल त्या वाहनाने घरी परतू लागले आहेत.

असेच काही लोक फलटण येथे कामानिमित्त गेले होते. लॉकडाऊन झाल्याने घरच्या ओढीने पायी चालत कागल परिसरात निघाले होते. अशा 16 जणांना पोलिसांनी अंकली टोलनाक्यावर अडवून त्यांची चौकशी केली. मिळेल त्या वाहनाने, पर्यायी चालत निघालेले हे लोक कागल परिसरातील, तर दोघेजण कर्नाटक राज्यातील आहेत अशी माहिती पुढे आली. त्यांना वाटेत पुरेसे जेवणही मिळले नाही. ही उदगावच्या ग्रामस्थांनी त्यांना जेवण दिले आहे. यानंतर पोलिसांनी या 16 लोकांची प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करून त्यांना जयसिंगपूर येथील सिध्देश्वर यात्री निवास येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के असताना चार जण बाहेर फिरत होते. पोलिसांनी चारही जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना सिद्धेश्वरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या