गोड बातमी! शुगर क्युब्ज नाही, आता येणार हनी क्युब्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साखरेच्या अतिरिक्त सेवनाने शरीरावर होणारे दुष्परिणाम हे सर्वांनाच आता कळून चुकले आहेत. ही साखर बहुतांशवेळा चहा किंवा कॉफीच्या माध्यमातून आपल्या शरीरात जात असते. अनेक जण घरात साखरेसाठी पर्याय म्हणून मधाचा वापर करतात. पण घराबाहेर मात्र याचा वापर करणं शक्य नसतं. मात्र, आता ही अडचणसुद्धा दूर होणार आहे.

केंद्र सरकारच्या खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे या साखरेच्या अतिरिक्त वापराला पर्याय म्हणून हनी क्युब्ज बाजारात विक्रीसाठी येणार आहेत. येत्या सहा महिन्यात बाजारात साखरेच्या क्बुजच्या धर्तीवर मधाचे क्युब्ज बाजारात येणार आहेत. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने भारत क्राफ्ट नावाचं एक पोर्टल सुरू केल आहे. त्या पोर्टलद्वारे या हनी क्युब्जची तसेच इतर उत्पादनांची विक्री करण्यात येणार आहे.

मध हा साखरेइतकाच गोड पदार्थ असून आरोग्यासाठी तितकाच फायदेशीर आहे. मधात असलेले अँटिऑक्सिडेंट्स, सी जीवनसत्व, खनिजे, अमिनो आम्ले आणि काही प्रमाणात एन्झाइम्स (सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य) असतात. मध बनवण्याची प्रक्रिया साखरेच्या तुलनेने कमी असते. तसंच सर्दी-खोकला, घशाचे आजार यांच्यावरही लाभदायक आहे.