
एखाद्या हॉटेलमध्ये जेवाताना आपण आनंदाने तिथल्या कर्मचाऱ्याला टिप देतो. पण ती टिप साधारण शंभर, दोनशे जास्तीत जास्त हजार ऐकली असेल मात्र अमेरीकेतील एका व्यक्तीने एका महिला वेटरला तब्बल एक लाखांची टिप दिली आहे. दरम्यान सोशल मीड़ीयावर एका स्पेसमध्ये हॉटेलच्या खाण्यावर चर्चेदरम्यान या केस स्टडीचा उल्लेख करण्यात आला. मात्र आता याचे कारणही समोर आले आहे.
मिडीया वृत्तानुसार, ही घटना जुनी असून नुकतीच त्यावर चर्चा करण्यात आली आहे. ही घटना दक्षिणी कॅरोलीना मध्ये घडली आहे. येथील यॉर्क काऊंटीमधील एका रेस्टॉरेण्टमध्ये काम करणारी महिला त्यावेळी गरोदर होती. मात्र तरीही ती काम करत होती. ती त्या रेस्टॉरेण्टमध्ये वेटरचे काम करत होती. काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये जेमी नावाचा एक व्यक्ती आपल्या मित्रांना जेवणासाठी घेऊन आला होता.
जेमीने अापल्या मित्रांसाठी जेवण ऑर्डर केले आणि त्याच महिलेने सर्वांना जेवण सर्व्ह केले. महिलेने अगदी चांगल्या पद्धतीने सेवा दिल्याने सर्वच प्रबावित झाले आणि बोलण्यातून त्यांना ती महिला गरोदर असल्याचे कळले. ती पैशांसाठी नोकरी करत होती. तिची मेहनत पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि जेमीने आपल्या मित्रांसोबत मिळून तिला 1 लाख रूपयांची टिप दिली. आधी तर महिलेने ते रूपये घेण्यासाठी नकारच दिला. मात्र जेमीने तिच्या हातावर पैसे ठेवल्यावर ती भावूक झाली. तिने रडून त्याला मिठी मारली. जेमीने सांगितले, त्याला वाटले तिला मदत करावी म्हणून त्याने केले. डेली मेलने हे वृत्त प्रकाशित केले होते त्यावेळी ही घटना प्रचंड व्हायरल झाली होती.




























































