वरळीत आत्मरंग उलगडणारे प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे भाऊ लव सिन्हा आणि कुश सिन्हा यांच्या चित्रांचे दोन दिवसीय प्रदर्शन वरळी येथे आयोजित करण्यात आले आहे. ‘हाऊस ऑफ क्रिएटिव्हिटी’ हा उपक्रम सिन्हा भावंडांनी सुरू केला आहे. त्याअंगतर्गत हे पहिले प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात जुलै 2021 मध्ये सिन्हा भावंडांनी ‘हाऊस ऑफ क्रिएटिव्हिटी’ नावाचा कला उपक्रम सुरू केला. त्यावेळी हा एक ऑनलाइन उपक्रम होता. या प्रदर्शनातून देशातील कलावंतांना त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळाली आहे. आता त्यांनी ऑफलाइन कलाप्रदर्शनाची तयारी केली आहे.

 ‘लोकस ऑफ पंट्रोल’ हा प्रदर्शनाचा विषय आहे. ‘लोकस ऑफ कंट्रोल’ ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. फक्त निमंत्रितांसाठी असलेले हे प्रदर्शन अभिनित खन्ना यांनी क्युरेट केले असून अनुष्का भटनागर यांनी यात सहाय्यक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. प्रदर्शन 9 आणि 10 एप्रिल रोजी वरळी येथील बी. एम. डब्ल्यू इन्फिनिटी कार्समध्ये आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात ‘हाऊस ऑफ क्रिएटिव्हिटी’ चे कलाकार आपली कला ही विविध चित्रे, छायाचित्रे, टेक्सटाईल आणि अन्य माध्यमातून समोर आणतील.  यामध्ये अली अकबर मेहता, अरविंद सुंदर, दिगबिजाई खटुआ, गोविंद शह आझाद, कोशी ब्रह्मात्मज, केदार डीके, सारिका मेहता, शलाका  पाटील, उर्वी सेठना, तुषार वाघेला, सोनाक्षी सिन्हा, लव सिन्हा आणि कुश सिन्हा या कलाकारांचा सहभाग आहे.

आत्मचित्रांची झलक

 प्रदर्शनाविषयी सोनाक्षी म्हणाली, नव्या चित्रमालिकेविषयी मी खूप उत्सुक आहे. माझ्या कलाकृती रंगांविषयी आहेत आणि त्यात माझी ओळखही दिसून येते. ही सेल्फ पोट्रेट्स आहेत. याआधी मी प्रामुख्याने मोनोक्रोम टोनमध्ये चित्रे काढली आहेत. परंतु  एके दिवशी मी पॅनव्हासवर रंगांची उधळण केली आणि त्यामुळे मी इतकी प्रभावित झाले की मी मागे वळून कधी पाहिलंच नाही.