खूप राग येतो! कसा आवरायचा?

>> डॉ. पवन सोनार

अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. मनाविरुद्ध घडतात. प्रचंड संताप होतो. सगळं असह्य होतं… आणि रागाचा स्फोट होतो. हा राग आपल्या सामाजिक, व्यावसायिक जीवनासाठी, मानसिक आरोग्यासाठी खूपच घातक ठरतो. समाजातील प्रतिमा उगाच मलीन होते. मानसिक आरोग्य बिघडते ते वेगळेच… कसा आवर घालायचा रागाला…?

राग येण्याची अनेक कारणे असू शकतात. पहिलं कारण म्हणजे कौटुंबिक इतिहास. तुमच्या घराण्यात पूर्वजांपैकी कुणाला खूप राग येत असेल तर तुम्हालाही एखाद्या छोट्याशा गोष्टीचा पटकन राग येऊ शकतो. दुसरं कारण म्हणजे एखादा विशिष्ट मानसिक आजार असेल तर त्यामुळेही माणसाला चटकन राग येऊ शकतो.  आजार म्हणजे ताणतणाव असेल, बायपोलर डिसऑर्डर, मूड डिसऑर्डर, स्क्रीझोफ्रेनिया किंवा कुणाला व्यक्तीमधील स्वभावविशेषाचा आजार असेल तर राग येण्याचे प्रमाण वाढते. या आजारांवर योग्य तो उपचार केला की रागावर ताबा मिळवणं शक्य होईल.

जर कुणी मद्यसेवन करत असेल, तर त्यामुळेही राग येण्याचे प्रमाण वाढते. थायरॉईडसारख्या काही आजारांमुळेही खूप राग येऊ शकतो. स्वभाव चिडचिडा बनतो. याशिवाय राग येण्याची आणखीही काही कारणे असू शकतात. यात तणावपूर्ण जीवन हे एक प्रमुख कारण मानता येईल. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण तणावाखाली राहू शकतो. त्यामुळे आपलं किंवा दुसऱ्याचीही थोडं जरी चुकलं तरी आपल्याला राग यायलाच हवा अशी आपली एक धारणा बनते. अमुक गोष्टीवर राग व्यक्त केलाच पाहिजे असं जणू ठरूनच गेलं आहे. एकदा ठरावीक गोष्टीवर राग व्यक्त करायला लागलो की मग तशी सवयच होते. ही सवय बनल्यामुळेही राग वारंवार येत असतो.

कसे नियंत्रण मिळवाल?

  • छोट्या छोट्या गोष्टींवर उगीचच प्रचंड राग येत असेल तर तो नेमका का येतो ते डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेतले पाहिजे. ते जाणून घेतल्यावर डॉक्टरांच्या किंवा मानसोपचार तज्ञाच्या सल्ल्याने त्यावर योग्य तो उपचार करून घेणंही महत्त्वाचं आहे.
  • काहीवेळा राग येणं हे कोणत्याही आजारामुळे नसतं, त्याला कोणतंही वैद्यकीय किंवा शास्त्र्ााrय कारण नसतं अशा रागासाठी काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यात पहिलं म्हणजे कुणाची एखादी गोष्ट चुकली तर आपण रागावलंच पाहिजे हे मनातून काढून टाका. कारण काहीही असले तरी रागाशिवायही त्यावर वेगळी प्रतिक्रिया आपण व्यक्त करू शकतो हे स्वतःला सांगणं.
  • नियमित मेडिटेशन म्हणजे विपश्यना करायलाच हवी. नियमित व्यायाम, एक्सरसाईज केली तर राग येण्याचं प्रमाण कमी होईल.
  • दुसऱ्या माणसाला माणूस समजणं. त्याच्याकडून चूक होऊ शकते. तो काही देव नाही असं मनात आणलं तर आपल्या रागावर आपण ताबा मिळवू शकतो. आपण दुसऱयाकडूनही खूप अपेक्षा ठेवतो. मग त्या पूर्ण झाल्या नाहीत की संताप वाढतो. पण त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या नाहीत तर राग येणार नाही.
  • बरेचदा स्वतःवरही आपण चिडतो. पण आपणही एक माणूस आहोत, आपल्याकडूनही चूक होऊ शकते असं मानलं तर आपण स्वतःवरही रागावत नाही.
  • चूक होणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही. त्यामुळे स्वतःला किंवा दुसऱयाला आपण माफ करण्याची सवय लावून घ्यायला हवी. तरच रागावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येईल. माफी देणं आणि घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. क्षमाशील राहणं यामुळे राग कमी करतं. कुणी वाईट वागलं असेल, कुणी चूक केली असेल तर आपण क्षमाशील राहिलो तरीही राग कमी होऊ शकतो.
  • मानसोपचार घेणं किंवा सायकॅट्रीककडून उपचार घेणं हेही खूप महत्त्वाचं आहे. झोप चांगली आणि पूर्ण होणं गरजेचं आहे. उपाशीपोटी राहिल्यावरही राग येण्याचं प्रमाण वाढू शकतं.
  • सुसंवाद साधला तर रागावर ताबा ठेवता येतो. घरात, मित्रमंडळींमध्ये सुवंवाद साधला तरीही राग येण्यासारखी वेळच येत नाही.

राग येतो तेव्हा…

कोणत्याही गोष्टीकर प्रतिक्रिया देण्यापूर्की पूर्ण किचार केला पाहिजे. राग कशामुळे येतो हे जाणून घ्या. राग येताना जर श्वास आणि हृदयाचे ठोके काढत असतील तर ते धोक्याचे आहे. म्हणून रागाकर नियंत्रण मिळकण्याचा प्रयत्न करा. राग येत असेल तेक्हा स्कतŠला जितके शांत ठेवता येईल तेवढा प्रयत्न करा. मनातल्या मनात कमीत कमी 10 किंका गरज असल्यास त्यापेक्षा जास्त अंक मोजा. यामुळे शांत होण्यासाठी केळ मिळेल. शांत झाल्याकर तुमचा राग सकारात्मक पद्धतीने सौम्य भाषेत क्यक्त करा. यामुळे तुम्हाला दुसऱ्याना न दुखाकता क्यक्त होता येईल. मंद श्वास घ्या. तीन सेकंद श्वास रोखून धरा. 1 ते 3 अंक मोजा आणि हळूहळू श्वास सोडा. पुन्हा 1 ते 3 अंक मोजा. राग आला की ही क्रिया 3 ते 4 केळा करा. रात्री पुरेशी झोप घेतलीत तर तुम्हाला प्रसन्न काटेल आणि राग आटोक्यात येईल. पण जास्त केळ झोपणे टाळा.

लेखक मानसोपचार तज्ज्ञ आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या