पोटाचा घेर वाढलाय, रात्री झोपण्याआधी ‘हे’ 4 पदार्थ खा; पटकन कमी होईल पोटावरची चरबी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वजन वाढणे, पोटाचा घेर वाढणे आरोग्याच्या समस्यांची सुरुवात मानली जाते, कारण त्यामुळे मधुमेह, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो.  एवढेच नाही तर पोट आणि कंबरेभोवतीच्या वाढत्या चरबीमुळे शरीराचा एकंदर आकार बिघडतो, ज्यामुळे व्यक्तीला लाजिरवाणे वाटते आणि  आत्मविश्वास कमी होतो. एकदा पोटाचा, मांड्याचा घेर वाढला की कमी होता होत नाही. अनेकजण रोज चालण्याचा व्यायाम करतात तरीही त्यांचे वजन कमी होत नाही.

जंक फूड, तेलकट खाद्यपदार्थ, फास्ट फूड इत्यादी अशा गोष्टी आपण अनेकदा खातो ज्यामुळे आपले आरोग्य बिघडते. तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाही. रात्री ऐनवेळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही. जाणून घेऊया त्या 4 पदार्थांबद्दल, जे रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्यास वजन झपाट्याने कमी होऊ लागते.

दही

जेवणाच दह्याचा समावेश जरूर करावा त्यात कॅलरी जास्त असतात आणि यातून प्रथिने मिळतात, त्यामुळे दोन स्नायूंना ताकद मिळते. यासोबतच दह्यामध्ये असलेले सूक्ष्म पोषक घटक पचनक्रिया बरोबर ठेवतात आणि वजनही कमी करतात.

बदाम

अनेक वेळा रात्री अचानक भूक लागते, हे अशा लोकांमध्ये घडते जे काही कारणाने उशिरा झोपतात. अशा वेळी बदाम खाऊ शकता. भूक भागवण्यासाठी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. बदामामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात आणि कॅलरीजही कमी असतात. भिजवून खाल्ल्यास जास्त फायदा होईल.

होल ग्रेन ब्रेड

जर तुम्हाला रात्री भूक लागली असेल तर तुम्ही पीनट बटर लावून होल ग्रेन ब्रेडचे 2 स्लाईस खाऊ शकता. हे चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते

केळी

केळी खाल्ल्याने वजन वाढते असे अनेकदा मानले जाते, परंतु केळ्यात असे अनेक पोषक तत्त्वे आढळतात जी वजन कमी करण्याचे काम करतात. या फळामध्ये असलेल्या फायबरमुळे जास्त वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.