
इडली मऊ होत नसेल तर तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवताना त्यात अर्धा कप साबुदाणा मिसळा. हे सर्व एकत्र वाटून इडली बनवल्यास ती खूपच मऊ होईल.
पोहे किंवा भात ः वाटण करताना मूठभर भिजवलेले पोहे किंवा अर्धी वाटी मऊ शिजलेला भात घातल्याने इडली हलकी आणि कापसासारखी मऊ होते.
इडली मऊ आणि लुसलुशीत करण्यासाठी योग्य प्रमाण, पोह्याचा वापर आणि पीठ व्यवस्थित आंबवणे आवश्यक आहे. मऊ इडलीसाठी 3ः1 किंवा 4ः1 प्रमाण (तांदूळ आणि उडीद डाळ), भिजवताना मूठभर पोहे किंवा मेथी दाणे वापरणे आणि पीठ हलके व एकरूप होईपर्यंत वाटणे या महत्त्वाचे आहे.




























































