फोनवर बोलत होती म्हणून पतीने केला पत्नीचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमध्ये सीतापूर भागात एका क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीचा खून केला आहे. पत्नी फोनवर बोलत होती, याचा राग आल्याने पतीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. त्यात पत्नीचा मृत्यू झाला. आरोपी पतीचे नाव विष्णू कुमार असून मृत पत्नीचे नाव सरोज कुमार आहे.

विष्णू कुमार आणि सरोज यांचे लग्न पाच वर्षापूर्वी झाले होते. दोघेही गावाबाहेरील एका घरात होते. घरात सरोजच्या प्रियंशी (7) आणि रीना (5) या दोन बहीणी उपस्थित होत्या. शनिवारी सरोज फोनवर बोलत होती. ही गोष्ट तिचा पती विष्णूला आवडली नाही. तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा विष्णूने रागाच्या भरात सरोजला मारहाण करण्यास सुरूवात केली. विष्णूने लाथा बुक्क्यांनी सरोजला तुडवले तसेच पट्ट्यानेही मारहाण केली. तेव्हा या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विष्णूला ताब्यात घेतले असूस पुढील तपास सुरू आहे.