राजकारणाच्या खेळात मी परफेक्ट; पहिल्या बॉलवर विकेट आणि सिक्सही असतो – पंकजा मुंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

स्व. गोपीनाथराव मुंडेंची मी कन्या आहे. बाबा नेहमी मला म्हणायचे, तू माझ्यासारखी आहेस. मी त्यांच्या सारखी दबंग आहे. त्यांच्या सारखीच जादूची कांडी आपल्या हातात आहे. राजकारणाच्या खेळातही मी परफेक्ट आहे. चेंडू हातात असला की पहिल्या बॉलवर मिडल स्टम्प उडवते आणि बॅट हातात असली की पहिल्या बॉलवर सिक्स मारते. त्यामुळे भिण्याचे कारण नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला मारला.

कै. तुकाराम गुरूजी गो धाम प्रकल्प पशूधन राहत व चारा शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी खासदार प्रीतम मुंडे, महंत शिवाजी महाराज, आमदार सुरेश धस, सविताताई गोल्हार, बदामराव पंडीत आदी उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, माझी विकासाची भूक अजून भागली नाही. पुढची पाच वर्षेही सत्ता माझ्याच हातात असेल. बीड जिल्ह्याचा विकास पूर्ण करायचा आहे. मी खेळाचे मैदान असो की राजकीय मैदान मी परफेक्ट आहे. त्यामुळे जिल्ह्याला भिण्याचे कारण नाही. पहिल्या बॉलवर जशी मी विकेट घेते तसेच पहिल्या बॉलवर सिक्सही मारते, असा टोला त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे ना मारला.