घरात फूट पाडू नका, मी चूक केली अशी जाहीर कबुवी अजित पवार यांनी दिली आहे. तसेच वस्ताद एक डाव राखून ठेवतो असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
गडचिरोलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सभा होती. धर्मरावबाबा अत्राम यांच्या मतदारसंघात ही यात्रा पार पडली. अत्राम यांच्या कन्या भाग्यश्री कदम आत्राम बंडखोरी करतील अशी चर्चा आहे. आत्राम यांनी आपल्या भाषणात हा मु्द्दाही मांडला. त्यावर अजित पवार म्हणाले की घरात फूट पाडू नका. काही जण घरात फूट पाडण्याचे काम करत आहेत. घरात फूट पडलेली समाजाला आवडत नाही, मी ती चूक केली पण ती चूक तुम्ही करू नका असे अजित पवार म्हणाले.
लग्न झाल्यावर मुलगी सासरी जाते, परंतु आत्राम यांनी तुम्हाल जिल्हा परिषदेत संधी दिली, तुम्हाला अध्यक्ष केलं. वस्ताद कुस्तीचे सगळे डाव शिकवतो पण एक डाव राखून ठेवतो असे सूचक विधानही अजित पवारांनी केले.
अजित पवार यांनी बंडखोरी करत महायुतीला पाठिंबा दिला आणि सरकारमध्ये सामील झाले. लोकसभा निवडणुकीतली अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण आपला हा निर्णय चुकला अशी कबुवी अजित पवार यांनी दिली होती. आता घरात फूट पाडून मी चूक केली अशी कबुलीही अजित पवार यांनी दिली आहे.