आयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले

154

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवारी झाला. यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’ जाहीर केली आहे. 12 सदस्यांच्या या संघामध्ये हिंदुस्थानच्या दोन खेळाडूंची वर्णी लागली आहे. स्पर्धेत पाच शतक झळकावून विक्रम करणारा रोहित शर्मा आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये जागा मिळाली आहे. परंतु टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मात्र या स्थान मिळालेला नाही.

रविवारी झालेल्या लढतीत इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला आणि पहिल्यांदाच विश्वचषक उंचावला. यानंतर सोमवारी आयसीसीने ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’ जाहीर केली. जेसन रॉय आणि रोहित शर्मावर सलामीची जबाबदारी देण्यात आली आहे, तर केन विलियम्सनकडे संघाची कमान आहे.

आयसीसीच्या या संघात विश्वविजेत्या इंग्लंडच्या चार खेळाडूंचा समावेश आहे, तर उपविजेत्या न्यूझीलंडच्या तीन खेळाडूंना यात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन आणि बांग्लादेशच्या एका खेळाडूला या संघात स्थान मिळाले आहे.

आयसीसीची ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’
जेसन रॉय (इंग्लंड), रोहित शर्मा (हिंदुस्थान), केन विलियम्सन (न्यूझीलंड), ज्यो रूट (इंग्लंड), शाकिब-अल-हसन (बांग्लादेश), बेन स्टोक्स (इंग्लंड), अॅलेक्स कॅरी (ऑस्ट्रेलिया), मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), जोफ्रा आर्चर (इंग्लंड), लॉकी फर्ग्यूसन (न्यूझीलंड) आणि जयप्रीत बुमराह (हिदुस्थान)

आपली प्रतिक्रिया द्या