
हेडिंग्ले कसोटीतील दोन्ही डावात लागोपाठ शतक ठोकल्याचा मोठा फायदा टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला झाला. ‘आयसीसी’च्या ताज्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत त्याने एका स्थानाने प्रगती करताना सहाव्या स्थानी झेप घेतली. पंतने पहिल्या कसोटीत 134 व 118 धावांच्या खेळय़ा केल्या होत्या. त्यामुळे त्याला फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला. मात्र, पंतची ही कारकीर्दीतील सर्वोच्च क्रमवारी नाही. कारण याआधी, त्याने 2022मध्ये पाचव्या क्रमांकापर्यंत झेप घेतलेली आहे. पंतने कारकीर्दीतील सर्वोत्तम 801 रेटिंग गुणांपर्यंत मजल मारली आहे. मात्र, अव्वल स्थानी असलेल्या कसोटी फलंदाज जो रूटपेक्षा तो 88 गुणांनी पिछाडीवर आहे.
अविश्वसनीय अन् अवघड; बुमराच्या विश्रांतीच्या निर्णयावर रवी शास्त्री हैराण