जागतिक रोबोटिक्समध्ये सहभागी विद्यार्थ्यांना आयसीआयसीआय लोम्बार्डचे सहकार्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीआयसीआय लोम्बार्ड या देशातील आघाडीच्या सामान्य विमा पंपनीने त्यांच्या कार्यालयात नुकतेच  ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज’ (एफजीसी) नावाच्या जागतिक कार्यक्रमात हिंदुस्थानचे  प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलांच्या संघाला निमंत्रित केले होते. ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज’ ही उच्च माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पिक शैलीतील आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धा आहे. विविध पार्श्वभूमी, संस्कृती आणि अनुभव यातील तरुणांना एकत्र आणणे आणि त्यांना भविष्यातील नेते, नवोन्मेषक बनण्यासाठी प्रेरित करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज’मध्ये 170 हून अधिक देशांतील संघ आहेत. स्पर्धेसाठी ते रोबोट तयार करतात आणि त्याचा विशेष प्रोग्रॅम तयार करतात.

आयसीआयसीआय लोम्बार्डने यजमानपद स्वीकारलेली मुले रोबोटिक्स उत्साही आहेत, ज्यांना मुंबईस्थित सामाजिक संस्था (एनजीओ) ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘अवसरा’ यांनी पाठिंबा दिला आहे. या कार्यक्रमासाठी निधी उभारणीची सुरुवात मिनल मजुमदार, संस्थापक, द इनोव्हेशन स्टोरी यांनी केली होती. ही  युवा विद्यार्थ्यांसाठीची शिक्षण तंत्रज्ञान अर्थात एडटेक स्टार्टअप आहे.