
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) मोठे निर्णय घेतले आहेत. यूएईमध्ये मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्यात इफ्तार पार्टीवर बंदी घातली आहे. देशात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
रमजानच्या महिन्यात यूएईमध्ये घर आणि ऑफिसमध्ये इफ्तार पार्टी देण्यात येते. राष्ट्रीय आपत्कालीन संकट आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनसीईएमए) करोना निर्बंधानुसार रेस्टॉरंट्सला इफ्तारचे जेवण रेस्टॉरंटमध्ये अथवा बाहेर वाटण्यास मनाई करण्यात आली आहे.
समाजाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी संध्याकाळी लोकांनी एकमेकांना भेटणे टाळावे तसेच एकमेकांच्या घरातील आणि कुटुंबातील अन्नपदार्थांची देवाणघेवाण करू नये असा सल्ला देण्यात आला आहे. एकाच घरात राहणारे लोक खाऊ आणि अन्न वाटू शकतात, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले






















































