लोणावळ्यात राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोणावळ्यात क्वीन-कव्हर टिपण्यासाठी दिग्गज कारमपटूंमध्ये जोरदार द्वंद्व रंगणार आहे. शिवजयंती उत्सव मित्र मंडळ आयोजित मच्छिंद्र खराडे यांच्या पुढाकाराने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येत्या 27 ते 29 जानेवारीदरम्यान कुमार रिसॉर्टमध्ये राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. महाराष्ट्र पॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार असून पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये चुरस पाहायला मिळेल. स्पर्धेतील विजेत्यांना एपंदर 1 लाख 10 हजारांची रोख पारितोषिके व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चषक देण्यात येईल.