कश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी आणि इस्लामिक वाहिन्यांवर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपवर निर्बंध घातल्यानंतर आता येथील पाकिस्तानी व इस्लामिक वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारने येथील केबल ऑपरेटरर्सला ३० पाकिस्तानी व इस्लामिक वाहिन्या बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. जम्मू-कश्मीरमधील शांतता व एकतेला या वाहिन्यांमुळे धोका निर्माण झाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये या वाहिन्या मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जातात. यामुळे त्या बंद झाल्यास केबल ऑपरेटर्सना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यामुळे बुधवारी या केबल ऑपरेटर्सची बैठक होणार आहे. या बैठकीवर राज्य सरकारच्या आदेशावर विचार करण्यात येणार आहे. या वाहिन्यांच्या माध्यमातून
जम्मू-कश्मीर खोऱ्यात हिंदुस्थानी जवान आणि सुरक्षा यंत्रणांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि दहशतवाद्यांबदद्ल सहानुभूती निर्माण करण्याचा दहशतवादी संघटनांचा डाव असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. याचपार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड येथे २१ व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनविरोधात नोटीस जारी करण्यात आली होती. यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी सीमेपलिकडील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून सायबर सेल सोशस मीडियावर नजर ठेवून आहे.

दरम्यान, २०१६ साली नगरोटा लष्कराच्या तळावर हल्ला करणाऱ्या जैश- ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना हल्लीच अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सीमेपलिकडील म्होरकयांच्या संपर्कात होतो. तेथूनच त्यांनी नगरोटा हल्ल्यासंदर्भात सूचना दिल्याचे पोलिसांना सांगितले.