कोस्टल रोडचे लोकार्पण लांबणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणारा आणि सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा पहिलाच मुहूर्त चुकल्यामुळे मुंबईकरांचा हिरमोड झाला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या 10.58 किमीच्या एकूण मार्गाचे सध्या 85 टक्के काम पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी 2 फेब्रुवारी रोजी केली होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱया महत्त्वाकांक्षी प्रकल्पात एकूण मार्गात तीन आंतरबदल व चार वाहनतळांचा समावेश आहे. या प्रकल्पात पुलासाठी देशातील पहिलीच एकलस्तंभी पाया आणि सकार्डो वायुवीजन यंत्रणा बसवण्यात आली आहे.

– कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणात तीन लेनची एकच बाजू सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये वरळीहून मरीन ड्राइव्ह येथे जाता येणार आहे. हा मार्ग सकाळी 8 ते रात्री 8 असा केवळ बारा तासच सुरू राहणार आहे.
– कोस्टल रोडला समांत अशी 7.5 किमी लांबीची फुटपाथ बांधण्यात येणार आहे.

– कोस्टल रोडच्या पहिल्या लोकार्पणाची तारीख अद्याप निश्चित नसल्याचे आज सांगण्यात आले. संपूर्ण कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने 15 मेपासून करणार असल्याचे पालिकेने याआधी जाहीर केले आहे.