अबू आझमी यांच्या तीन ठिकाणांवर आयटीच्या धाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयकर विभाग (इन्कम टॅक्स)ने आज समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसीम आझमी यांचा संबंध असलेल्या मुंबई, लखनौ आणि वाराणासी येथील विविध ठिकाणी छापेमारी केली. आयकर विभागाने याआधी अबू आझमी यांना 160 कोटी रुपयांच्या टॅक्स चोरी प्रकरणी समन्स बजावले होते. वाराणासीमधील विनायक ग्रुप प्रकरणाच्या चौकशी दरम्यान आझमी यांचे नाव समोर आले होते. विनायक ग्रुपने वाराणासीत अनेक शॉपिंग सेंटर, इमारती, मॉल आणि रेसिडेंसियल इमारतीचे बांधकाम केले आहे. आयटी विभागाच्या माहितीनुसार, सर्वेश अग्रवाल, समीर दोषी आणि आभा गुप्ता विनायक समूहातील तीन पार्टनर्स आहेत. आभा गुप्ता या गणेश गुप्ता यांच्या पत्नी असून गणेश ते अबू आझमीचे मित्र आहेत, असे बोलले जाते. गणेश गुप्ता याआधी समाजवादी पार्टीचे महासचिव होते. परंतु, त्यांचे निधन झाले आहे. विनायक ग्रुपचे इन्कम चार विभागात विभागले जात असत. त्यातील एक भाग अबू आझमींना मिळायचा असा आरोप आहे.