
सामना ऑनलाईन । लंडन
तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवल्यानंतर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेत विजय मिळवण्यासाठी हिंदुस्थानचा संघ सज्ज झाला आहे. नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रीत केले आहे. हिंदुस्थानकडून वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने वन डेमध्ये पदार्पण केले आहे. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत कौलला टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
दुसरीकडे सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंडच्या संघाला झटका बसला असून फॉर्मात असलेल्या अॅलेक्स हेल्स दुखापतीमुळे सामना खेळणार नाही. त्यामुळे टी-२० पराभव सहन कराव्या लागलेल्या यजमान संघापुढे हिंदुस्थानच्या वेगवाना आणि फिरकी माऱ्याचा सामना करण्याची मोठे आव्हान असणार आहे.
हिंदुस्थानी संघ –
रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), सुरेश रैना, एमएस धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव, युजेंद्र चहल, कुलदीप यादव.
इंग्लंडचा संघ –
जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रूट, इयोन मॉर्गन (कर्धणार), बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), मोईन अली, डेविड विली, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, मार्क वुड.




























































