
तिसऱया कसोटी क्रिकेट सामन्यावर शनिवारचा दिवस खऱया अर्थाने यशस्वी अन् शुभ ठरला. यजमान हिंदुस्थानने तिसऱया दिवशी राजकोट कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. मोहम्मद सिराजच्या भन्नाट गोलंदाजीनंतर यशस्वी जैस्वाल (104) व शुबमन गिल (नाबाद 65) इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ला फोडून काढले. पहिल्या डावात 126 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतल्यानंतर हिंदुस्थानने तिसऱया दिवसाच्या उर्वरित 51 षटकांच्या खेळात 2 बाद 196 धावसंख्येपर्यंत मजल मारून दुसऱया डावातील आपली आघाडी 322 धावसंख्येपर्यंत वाढवली. दिवसभराचा खेळ संपला तेव्हा पाठदुखीमुळे यशस्वी जैस्वाल रिटायर्ट हर्ट झालेला होता, तर कुलदीप यादव 3 धावांवर शुबमन गिलला साथ देत होता.
जैस्वालचे शतक, गिलचे अर्धशतक
पहिल्या डावातील शतकवीर कर्णधार रोहित शर्मा दुसऱया डावात केवळ 19 धावा काढून माघारी परतला. फिरकीपटू ज्यो रुटने त्याला पायचित पकडले, मात्र त्यानंतर दुसरा आघाडीवर यशस्वी जैस्वाल व आलेला शुबमन गिल यांनी इंग्लिश गोलंदाजी फोडून काढली. जैस्वालने राजकोट कसोटीतील दुसऱया डावात शतकी खेळी साकारली. त्याने 133 चेंडूंत ठोकलेल्या 104 धावांच्या खेळीला 5 षटकार व 9 चौकारांचा साज होता. शुबमन गिलनेही अर्धशतक साजरे केले. या दोघांनी दुसऱया विकेटसाठी 155 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शतकी खेळीनंतर जैस्वालच्या पाठीची उसण भरली. फिजिओने उपचार केल्यानंतरही पाठीचा त्रास कमी न झाल्याने त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. मात्र त्याच्या जागेवर आलेला रजत पाटीदारला भोपळाही फोडता आला नाही. केवळ दहा चेंडूंचा सामना करून तो टॉम हर्टलेच्या गोलंदाजीवर रेहान अहमदकरवी झेलबाद झाला. 65 धावांवर नाबाद असलेल्या गिलने 120 चेंडूंत 2 षटकारांसह 6 चेंडू सीमापार धाडले. इंग्लंडकडून ज्यो रुट आणि टॉम हर्टले यांना 1-1 विकेट मिळाली.
View this post on Instagram




























































