हिंदुस्थानची विजयी सलामी, आठ गडी राखून न्यूझीलंडला चारली धूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नेपियर

ऑस्ट्रेलिया दौऱयावर इतिहास घडवून न्यूझीलंडच्या स्वारीवर आलेल्या विराट कोहलीच्या हिंदुस्थानने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयी सलामी दिली. यजमान न्यूझीलंडचा आठ गडी राखून धुव्वा उडवत ‘टीम इंडिया’ने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सर्वच गोलंदाजांनी केलेली भन्नाट कामगिरी आणि शिखर धवनची अर्धशतकी खेळी ही या विजयाची प्रमुख वैशिष्टय़े ठरली. तीन बळी टिपणारा मोहम्मद शम्मी सामन्याचा मानकरी ठरला.

न्यूझीलंडकडून मिळालेले 156 धावांचे लक्ष्य ‘टीम इंडिया’ने 34.5 षटकांत केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. रोहित शर्मा (11) आणि शिखर धवन (नाबाद 75) यांनी 41 धावांची सलामी दिली. डग ब्रेसवेलने रोहितला गप्टिलकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर शिखर धवन व कर्णधार विराट कोहली यांनी दुसऱया गडय़ासाठी 91 धावांची भागीदारी केली. लॉकी फर्ग्युसनच्या उसळत्या चेंडूला भिरकावण्याच्या नादात विराटने यष्टीमागे लॅथमकडे झेल दिला. त्याने 59 चेंडूंत 3 चौकारांसह 45 धावा केल्या. शेवटी धवनने आलेल्या अंबाती रायुडूच्या (नाबाद 13) साथीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. शिखर धवनने 103 चेंडूंना सामोरे जाताना 6 चौकारांसह आपली नाबाद 75 धावांची खेळी सजवली. त्याआधी, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया न्यूझीलंडने हिंदुस्थानी गोलंदाजीपुढे सपशेल शरणागती पत्करली. न्यूझीलंडचा डाव 38 षटकांत 157 धावांवर संपुष्टात आला. हिंदुस्थानकडून मोहम्मद शमीने 3, कुलदीप यादवने 4, तर युजवेंद्र चहलने 2 बळी टिपले.

अन् प्रखर प्रकाशामुळे सामना थांबला
लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानने 1 बाद 44 धावसंख्येपर्यंत मजल मारली तेव्हा मावळत्या सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे सामना थांबवावा लागला. सूर्याची किरणं खेळाडू क पंचांच्या थेट डोळय़ांकर येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. अंधुक प्रकाशामुळे सामना थांबविण्यात आल्याची घटना नवी नाही, मात्र क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच प्रखर प्रकाशामुळे सामना थांबवावा लागला. अर्धा तासाचा खेळ वाया गेल्याने हिंदुस्थानला विजयासाठी 49 षटकांत 156 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते.