
हिंदुस्थान व यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यातील 19 वर्षांखालील तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील अंतिम सामना पावसामुळे नाणेफेक न होताच रद्द झाला. त्यामुळे उभय संघांना संयुक्त विजेते घोषित करून जेतेपदाची ट्रॉफी विभागून देण्यात आली. ‘बीसीसीआय’ने स्पर्धेतील पारितोषिक वितरण सोहळय़ातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. सामनाधिकाऱयांनी पाऊस थांबण्यासाठी कट ऑफ टाईमपर्यंत वाट बघितली, मात्र पावसाची बॅटिंग न थांबल्यामुळे शेवटी हा अंतिम सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. साखळी फेरीत हिंदुस्थानच्या युवा संघाने सर्व लढती जिंकल्या होत्या. अफगाणिस्तानवर 6 विकेट राखून विजय मिळवित हिंदुस्थानने स्पर्धेची झकास सुरुवात केली होती.


























































