‘इंडिया अनबाऊंड’ मासिकाच्या संपादकाचा मृतदेह आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

‘इंडिया अनबाऊंड’ या मासिकाचे संपादक (ग्रुप एडिटर) नित्यानंद पांडे यांचा मृतदेह भिवंडी येथे आढळून आला आहे. त्यांच्या मृतदेहावर मारहाणीच्या खूणा असल्याने त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पांडे हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

भिवंडीतील खारबाव गावातील एका पुलाच्या खाली पांडे यांचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. त्यांच्या डोक्यावर मारहाणीच्या खूणा आहेत. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

इंडिया अनबाऊंडचे मुख्य कार्यालय अंधेरी येथे असून त्याचे संपादकीय काम मीरारोड येथील कार्यालयात होते. 15 मार्चला नित्यानंद पांडे हे नेहमीप्रमाणे कार्यालयात गेले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदविली होती.