
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन एक दिवसीय सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. शुक्रवारी रांचीमध्ये झालेल्या एक दिवसीय सामन्यात हिंदुस्थानला 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यानंतर धोनीला पुढील दोन सामन्यात विश्रांती देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
विराटची शतकी झुंज अपयशी, ऑस्ट्रेलियाने रांची जिंकले
रांची येथे झालेल्या एक दिवसीय सामन्यानंतर आता धोनी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकात खेळताना दिसेल. हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियातील चौथा सामना 10 मार्चला मोहाली आणि पाचवा सामना 13 मार्चला दिल्लीमध्ये खेळला जाईल. यानंतर ऑक्टोबरपर्यंत हिंदुस्थान मायदेशात एकही सामना खेळणार नाही. त्यामुळे रांचीतील सामना धोनीचा हिंदुस्थानातील अखेरचा सामना होता अशी चर्चा क्रीडा वर्तुळात सुरू आहे.
माहीची शहिदांना अनोखी श्रद्धांजली, जवानांच्या टोप्या घालून खेळतेय टीम इंडिया
विश्वचषकानंतर निवृत्तीची शक्यता
इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. परंतु झारखंड राज्य क्रिकेट संघाने मात्र धोनीने स्थानिक क्रिकेटमधून एक सामना खेळावा आणि सन्मानपूर्वक निवृत्ती घ्यावी अशी आशा व्यक्त केली आहे. परंतु धोनीला अशा चमकोगिरीची सवय नसल्याने असे होण्याची शक्यता फार कमी आहे.
… आणि मैदानात शांतता पसरली
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात नाबाद 59 धावांची खेळी करणारा धोनी त्यानंतर झालेल्या दोन सामन्यात शून्य आमि 26 धावा करू शकला. रांचीमध्ये लोकल बॉय धोनी लवकर बाद झाल्याने मैदानावर उपस्थित प्रेक्षकांमध्ये शांतता पसरली.
























































