पंत दुखापतीतून सावरतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे हिंदुस्थानचे खेळाडू पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा घाम काढत असताना क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कार अपघातामध्ये जखमी झालेला हिंदुस्थानचा यष्टिरक्षक ऋषभ पंत दुखापतीतून सावरत आहे. पंतने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये तो चालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी ऋषभचा कार अपघात झाला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार पूर्ण झाले असून तो सध्या घरी आराम करत आहे. आज (दि. 10) पंतने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पंत चालण्याचा प्रयत्न करताना दिसत असून त्याला मैदानात परत येण्याचे वेध लागल्याचे दिसत आहे. पंतच्या उजव्या पायाला अद्याप सूज असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. तरीदेखील तो पाय पुढे टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करताना ‘एक मजबूत पाऊल, एक पाऊल पुढे’ अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.