हिंदुस्थानी तिरंदाज पात्रता फेरीत भिडणार, पहिल्याच दिवशी महिला व पुरुष वैयक्तिक गटात खेळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या ‘टोकियो ऑलिम्पिक’मधील अभियानाला पहिल्याच दिवशी अर्थातच शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. हिंदुस्थानच्या तिरंदाजांना पात्रता फेरीत आपले काwशल्य अजमवावे लागणार आहे. महिला एकेरी व पुरुष एकेरी या गटांमध्ये हिंदुस्थानचे चार खेळाडू जिवाचे रान करतील. दीपिका कुमारी, अतानू दास, प्रवीण जाधव व तरुणदीप राय या चार तिरंदाजांवर हिंदुस्थानची मदार असणार आहे.

23 ते 31 जुलै दरम्यान लढती

तिरंदाजी या खेळाचे वेळापत्रक 23 ते 31 जुलै असे असणार आहे. पहिल्या दिवशी महिला व पुरुष वैयक्तिक गटाच्या पात्रता फेरी रंगतील. 24 जुलै रोजी मिश्र गटाच्या लढती होणार आहेत. पुरुषांच्या सांघिक गटाच्या लढती 26 जुलै रोजी पार पडतील. तसेच 27 ते 31 जुलै दरम्यान पुरुष व महिला वैयक्तिक गटाच्या सर्व लढती खेळवण्यात येतील.

चारच खेळाडू पात्र

टोकियो ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानचे चारच खेळाडू पात्र ठरले आहेत. महिला गटात दीपिका कुमारी हिलाच ऑलिम्पिकचे तिकीट बुक करता आले. हिंदुस्थानला महिलांच्या सांघिक गटात टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरता आले नाही. तसेच पुरुष गटात अतानू दास, प्रवीण जाधव व तरुणदीप राय या तीन खेळाडूंना पात्रता मिळवता आली आहे.

आजच्या लढती

महिला पात्रता फेरी (वैयक्तिक गट)

दीपिका कुमारी

पहाटे 5.30 वाजता

पुरुष पात्रता फेरी (वैयक्तिक गट)

अतानू दास,

प्रवीण जाधव,

तरुणदीप राय

सकाळी 9.30 वाजता